Advertisements
Advertisements
कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
Concept: वस्तू
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Concept: वस्तू
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
क्र. | मुद्दे | वस्तू |
1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
2. | कवितेचा विषय - | |
3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. स्नेह - ______ |
ii. निखालस - ______ |
Concept: वस्तू
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. उत्तरे लिहा: (2)
- म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार - ______
- आपल्या तरुण मुलाला “माणसं' दाखवणारा - ______
शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ, समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस! आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवत आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड-कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो. |
2. आकृती पूर्ण करा. (2)
3. स्वमतः (3)
'वाट पाहणं' ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
Concept: वाट पाहताना
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
आश्वासक चित्र
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Concept: आश्वासक चित्र
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
क्र. | मुद्दे | आश्वासक चित्र |
1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
2. | कवितेचा विषय - | |
3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. झरोक - ______ |
ii. कसब - ______ |
Concept: आश्वासक चित्र
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. नावे लिहा. (2)
- गर्दीनं फुललेलं स्टेशन - ______
- अरुणिमाचे गाव - ______
दोस्तांनो, मी... अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही... नव्हते.. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला... लखनऊपासून २०० किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. |
2. कारणे लिहा. (2)
- अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते; कारण ______
- अरुणिमाने ‘सीआयएसएफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला; कारण ______
3. स्वमत (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Concept: गोष्ट अरुणिमाची
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कृती करा. (2)
पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’ मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!’’ ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते. |
(2) एका शब्दात उत्तर लिहा. (2)
- एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.
- अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.
(3) स्वमत. (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Concept: गोष्ट अरुणिमाची
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
Concept: खोद आणखी थोडेसे
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (2)
- सकारात्मक राहा.
- उतावळे व्हा.
- खूप हुरळून जा.
- संवेदनशीलता जपा.
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
(2) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. (2)
कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ |
(1) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली | (i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. |
(2) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी | (ii) सगळे लोक फसवे नसतात. |
(iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
(4) काव्यसौंदर्य (2)
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: खोद आणखी थोडेसे
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
Concept: वीरांगना
'पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: वीरांगना
‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Concept: वीरांगना
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Concept: वीरांगना
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. चौकटी पूर्ण करा. (2)
- कष्टाने मिळणारे - ______
- घामातून फुलणारे - ______
आकाशी झेप घे रे पाखरा तुजभवती वैभव, माया तुज पंख दिले देवाने कष्टाविण फळ ना मिळते घामातुन मोती फुलले |
2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा. (2)
i. सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
(अ) सुखाचा तिरस्कार वाटतो.
(ब) सुखाबद्दल प्रेम वाटते.
(क) सुखाचे आकर्षण वाटते.
(ड) सुख उपभोगण्याची सवय लागते.
ii. पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
(अ) काया सुखलोलुप होते.
(ब) पाखराला आनंद होतो.
(क) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
(ड) आकाशाची प्राप्ती होते.
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
4. काव्यसौंदर्य (2)
‘आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा’
या ओळींमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: आकाशी झेप घे रे
खालील पंक्तींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’
Concept: आकाशी झेप घे रे
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. कृती पूर्ण करा: (2)
झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछान्यात आली, की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन् रूपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछान्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. सोनाली आणि रूपाली लहान होत्या तोपर्यंत रूपालीच अंगापिंडानं मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली सात दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रूपाली तिच्यावर गुरगुरली, की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. |
2. कोण ते लिहा: (2)
- सोनालीवर ताईगिरी करणारी - ______
- झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी - ______
3. स्वमतः (3)
सोनाली व रूपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: सोनाली
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृती पूर्ण करा. (2)
न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हांला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, ‘‘राजाभाऊ, उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे?’’ सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त पाच मिनिटं.. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही; पण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबो वेटरबाबत खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हांला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो.’’ एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. |
(2) उत्तरे लिहा. (2)
- रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा.
- रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा.
(3) स्वमत. (3)
रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: निर्णय
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. चौकटी पूर्ण करा: (2)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
2. आकृतिबंध पूर्ण करा: (2)
3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा: (2)
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
4. काव्यसौंदर्यः (2)
'आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.'
या ओळींतील विचारसौदर्य स्पष्ट करा.
Concept: तू झालास मूक समाजाचा नायक
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
Concept: व्युत्पत्ती कोश