Advertisements
Advertisements
प्रश्न
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर
कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी प्रस्तुत कवितेत निसर्गाच्या विविध प्रतीकांतून नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे दर्शन घडवले आहे. कवयित्रीला वाटते, की पुन्हा एकदा आकाशातील विजेसारखा सळसळता उत्साह माणसात संचारावा आणि त्याच्या हातून नवनिर्माणाचे कार्य व्हावे. कोसळणाऱ्या पावसाच्या सरी जशा मातीला चिंब भिजवून तिच्याशी एकरूप होतात, तसेच माणसाने समाजातील भेदभाव, असमानता विसरून एकोप्याने राहिले पाहिजे. बदलाचे जोरदार वारे वाहून इथला युवकवर्ग त्यांनी भारून गेला पाहिजे व त्याने आपली तहानभूक हरपून नवनिर्माणाचा ध्यास घेतला पाहिजे, ज्यामुळे आपल्या भारत देशाचे नाव साऱ्या विश्वात गाजेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
(१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
(२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
(३) | भुकेलेले बाळ | ||
(४) | पांडुरंगाची |
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. | पाया रचणे | |
आवार रचणे | ||
खांब होणे | ||
कळस चढवणे |
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.