Advertisements
Advertisements
Question
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
Solution
ॲनी सुलिव्हॅन या शिक्षिकेची भेट होण्यापूर्वी हेलन केलरचे आयुष्य अज्ञानाच्या अंधकारात हरवले होते. बहिरेपणा, अंधत्व व मुकेपणा यांमुळे तिचे जीवन एकाकी झाले होते; परंतु नवीन शिक्षिकेमुळे व त्यांच्या प्रयोगशील अध्यापन पद्धतीने हेलनला शब्दांची ओळख होऊ लागली. जेव्हा परिचित वस्तूंची नावे तिला कळू लागली तेव्हा तिच्या जीवनात चैतन्य निर्माण झाले. पूर्वी हेलनचे आयुष्य हे समुद्रात वाट चुकलेल्या जहाजाप्रमाणे होते, ज्यास निश्चित असा मार्ग ठाऊक नव्हता; परंतु ॲनी सुलिव्हॅन या बाईंनी तिला ज्ञानाचा मार्ग दाखवला. तिच्या मूक जगात शब्द व शब्दांचे अर्थ उमटू लागले. नवनवीन शब्द शिकण्याचा उत्साह तिच्यात निर्माण झाला आणि या शिकण्याच्या ओढीमुळेच हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा 'उद्याची' वाट पाहत असावी असे मला वाटते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
कारणे लिहा.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
आकृतिबंध पूर्ण करा.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.