Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
उत्तर
मी अनुभवलेला पाऊस
पावसाळा माझा आवडता ऋतू आहे. पावसात मित्रांसोबत खेळायला, शाळेत जातांना भिजायला मला फार आवडतं. एकदा शाळा सुरु झाली की मी पावसाची वाट बघत असतो. पावसाच्या वाहत्या पाण्यात जहाज बनवून खेळण हा माझा आवडता खेळ आहे.
मला रिमझिम पाऊस आवडतो परंतु माझा मागील वर्षाचा पावसाचा भयानक अनुभव मला आजही लक्षात आहे. रात्रीची वेळ होती. घरातील सर्वजण झोपायची तयारी करत होते तेवढ्यात जोर-जोरात वारे सुटू लागले आणि वीज कोसळण्यास सुरुवात झाली. धो-धो पाऊस पडायला लागला.
मुसळधार पावसाच्या आवाजाने मी घाबरलो. पाऊस इतका तीव्र होता की रस्त्यावरील झाडे तूटून पडली. टी. व्ही. वरील बातम्यांतून कळले की, काही लोकांच्या घरात पाणी सुद्धा साचले, रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली त्यामुळे काही लोक घरी पोहचू शकले नाही. हळू हळू पावसाने अधिकच उग्र रूप धारण केले. घरातून बाहेर डोकवल्यास फक्त काळोखच दिसत होता. असा हा पावसाचा कहर रात्रभर सुरूच होता.
रात्रीच्या वेळेची ती गडगडाट आणि पावसाचा धुमाकूळ माझ्या मनात भीती निर्माण करत होता. त्या धुमशान पावसाने सगळीकडे एक अफाट चित्र निर्माण केले होते. वातावरणातील अस्थिरता आणि आकाशातून येणारे विजेचे कडकडाट यामुळे सगळीकडे भयानक शांतता पसरली होती.
घराच्या खिडक्यांवर जोरदार पाऊस कोसळत होता आणि त्याचा आवाज माझ्या कानांमध्ये गुंजत होता. अशा प्रकारे, प्रत्येक क्षणाला एक नवीन भयानक चित्र उभे राहत होते. घराबाहेर पाहिल्यास, पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील गटारे ओसंडून वाहत होते, आणि त्यामुळे सगळीकडे पाण्याचा आवाज ऐकू येत होता.
रात्रभर चाललेल्या या पावसाच्या कहराने सकाळी जेव्हा पाऊस थांबला, तेव्हा बाहेरचे दृश्य पाहून धक्का बसला. रस्त्यावर झाडांची फांदी, वाहते पाणी, आणि चिखलाचे ढीग सर्वत्र पसरले होते. काही ठिकाणी विजेच्या खांबांचे नुकसान झाले होते, ज्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद पडला होता.
या अनुभवाने मला निसर्गाच्या शक्तीचे, त्याच्या सौंदर्याचे आणि त्याच्या क्रूरतेचे दर्शन घडवले. या पावसामुळे जरी बरेच नुकसान झाले, तरी त्याचे अविष्कार आणि त्याची तीव्रता नेहमी माझ्या मनावर कोरली गेली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
नमुना कृती.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.
वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुदूदांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.